ज्या ठिकाणी या मंडळाची स्थापना झाली तो मूळचा शनिवार हौद चौक. आपण ज्याला शनिवार चौक किवा 501 पाटी म्हणतो त्याच हे खर नाव. हा चौक स्वतंत्र लढ्यामध्ये नुसता सक्रिय नव्हे तर आघाडीवर होता, लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य संग्रामसाठी एकत्र येण्याचे आवाहन करताना सार्वजनिक गणेशोत्सवाचे आवाहन केले, त्याला प्रतिसाद देत या चौकातल्या मंडळीनी गणेशमेळा स्थापन करून स्वातंत्र्याचा लढ्यात उडी घेतली. पुढे गणेश मेळ्यातल्या मंडळीनी या चौकात 101 वर्षापूर्वी म्हणजेच 1922 साली पहिल्यांदा गणपती बसवला त्यावेळी या मंडळाचे नाव होते " सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ". त्याकाळी मंडळांची संख्या अगदी मोजकी होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात केवळ या चौकातलेच नव्हे तर खूप दूर दूरचे कार्यकर्ते एकत्र येत असत. कालांतराने मंडळांची संख्या वाढत गेली आणि स्वातंत्र्याच्या आसपास जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा रोप्यमोहोत्सव साजरा होत होता त्याच वेळी या मंडळाने 'जयहिंद व्यायाम मंडळ' हे नाव धारण केले.
No images found.